उपविभागात येणारे घाटरस्ते
करूळ घाट :
करूळ घाट हा मुख्यता वैभववाडी व गगनबावडा या दोन तालुक्यांना जोडला असून हा घाट मुख्यता वैभववाडी तालुक्या मधे येतो. या घाटाचे अंतर १३ कि.मी.आहे. कोकणातील एकूण घाटमार्गापैकी करूळ घाट पर्यटकांना व या मार्गे येणा-या प्रवाशांना अधिक मोहिनी घालणारा घाट असा उल्लेख केला जात आहे घाटातील नागमोडी वळणे, उंचावर असलेला किल्ले गगनगड, खोल दरीत दिसणारी टूमदार घरे, सकाळच्या वेळी दरीतून उसळी मारणारे धुके यामुळे या मार्गे प्रवास करणारे पर्यटक घाटमार्गात मनमुराद आनंद घेतात. पर्यटकांना मोहिनी घालणारा घाट असाही या घाटाचा उल्लेख केला जातो.
भुईबावडा घाट :
भुईबावडा घाट हा सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता आहे .तसेच हा घाट कोल्हापुरातील गगनबावडा या मार्गे सुधा लागून आहे. घाटाची लांबी अवघी ९ ते १० कि.मी. असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून निघते.छोट्या-मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत पहीलाच मोठा धबधबा आणि लगत छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या या खडकांमधून जागोजागी पाणी वाहते. पावसांच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो.
फोंडा घाट:
हा घाट फोंडा गावाला जोडून असून तो दाजीपुर या कोल्हापूर भागाला जोडला जातो. तसेच राधानगरी मार्गे दाजीपुर हे गाव संपल्यानंतर फोंडा घाट चालू होतो. फोंडा घाट प्राचिन घाट आहे. फोंडा घाटाचे अंतर सुमारे 10 किलोमीटर आहे. घाट उतरताच फोंडा गाव लागते. फोंडा गावाच्या नावावरून या घाटाला फोंडा फोंडाघाट असे म्हणतात.रस्ता वळणावळणाचा आणि डोंगराळ असल्याने प्रवासाला थोडा वेळ लागतो, परंतु निसर्गरम्य दृश्यांनी भरलेला हा प्रवास खूप आनंददायक असतो. छोट्या छोट्या धबधब्यांनी घाटाचे सौंदर्य अजून वाढते. सूर्यास्ताच्या वेळी घाटामधून प्रवास करणे खूप आनंददायी वाटते.
अनुक्रमाणिका
Toggle