जमीन बाब / जबाबी

उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित अकृषिक , रेखांकन, वि‍भाजन परवानगी, सि.आर.झेड, कांदळवन, खाजगी/राखीव वन, शासकीय जमिन, गावठाण, अनधिकृत वृक्षतोड, बिनशेती/वाटप अपिल, पुरवठा वि‍षयक कामकाज करणे

१.   अकृषिक परवानगीबाबत कामकाज ( ४२ अ,ब,क व ड नुसार अकृषिक परवानगी )

२.   रेखांकन/विभाजन/मुदतवाढ/शर्तभंग/शर्तबदल परवानगीबाबत कामकाज.

३.   सी. आर. झेड. बाबत कामकाज.

४.   कांदळवनाबाबत कामकाज.

५.   खाजगी वन/राखीव वनाबाबत कामकाज.

६.   अनधिकृत वृक्षतोडीबाबत कामकाज.

७.   शासकीय जमिन व त्‍यावरील अक्रिमणांबाबत कामकाज. 

८.   गावठाणबाबत कामकाज.

९.   संकलनाशी संबंधित तक्रार अर्जाबाबत कामकाज.

१०.  संकलनाशी संबंधित माहिती अधिकाराबाबत कामकाज.

११.  संकलनासी संबंधित तारांकीत/अतारांकीत/लक्षवेधी सूचनाबाबत कामकाज.

१२.  बिनशेती / वाटप/ रिव्‍हीजन अपिलांसंबंधित कामकाज.

१३.  पुरवठाविषयक कामकाज.

१४.  संकीर्ण.

उपवि‍भागाचे अधिनस्‍त गावांमध्‍ये महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत जमिनीस/भूखंडास अकृषिक परवानगी देणेच्‍या अर्जावर अकृषिक सनद परवानगी देणेची व रेखांकन/विभाजन/मुदतवाढ/शर्तभंग/शर्तबदल  परवानगीबाबत देणेबाबत कार्यवाही करणे,  सि.आर.झेड, कांदळवन/खाजगी वन/राखीव वन, अनधिकृत वृक्षतोड, शासकीय जमिन व त्‍यावरील अतिक्रमणे, गावठाणाबाबत घोषित करणे संबंधित प्रस्‍तावावर कार्यवाही करणे, संकलनाशी संबंधित माहिती अधिकार, तारांकीत/अतारांकीत/लक्षवेधी सूचना, बिनशेती / वाटप/ रिव्‍हीजन अपिलांसंबंधित कामकाज, पुरवठा वि‍षयक कामकाज व संकलनाशी संबंधित इतर तक्रार अर्जांबाबत कार्यवाही करणे.

नाव – श्री. योगेश कृष्‍णा कुडाळकर, पदनाम – ग्राम महसुल अधिकारी

१.          शासकीय ज‍मीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्‍काषित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत शासन परिपत्रक क्रमांक जमीन-०७/२०१३/प्र.क्र.३७४/ज-१ दिनांक १०/१०/२०१३.   

२.         महाराष्‍ट्र खाजगी वन (संपादन) अधिनियम, १९७५ च्‍या कलम ६ अंतर्गत मुक्‍त व कलम २२अ अंतर्गत पुन:स्‍थापित जमिनीच्‍या खरेदी-विक्रीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एस-३०/२००८/प्र.क्र.२८१/भाग-१/फ-३  दिनांक ०८/१२/२०१७.

३.         किनारी नियमन क्षेत्र अधिसुचना – शासन राजपत्र अधिसुचना दिनांक १८/०१/२०१९.      

४.         राज्‍यात गावठाण राबविण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत शासन नि‍र्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक दिनांक २२/०२/२०१९.

५.         इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्‍यावयाची अंतरे लागु करणेकरीता कलम-१५४ अन्‍वये निदेश- शासन नि‍र्णय क्रमांक टिपीएस-१८१९/अनौसं-३६/ १९/नवि-१३ दिनांक ०५/०८/२०१९.

६.         महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत जमिनीस/भूखंडास आवश्‍यक असलेल्‍या अकृषिक परवानगी संदर्भात शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२३/प्र.क्र.६४/ज-१अ दिनांक १३/०३/२०२४.

७.         औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करावयाचा असल्‍यास अकृषिक सनद आवश्‍यक नसल्‍याबाबत शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२४/प्र.क्र.१८०/ज-१अ दिनांक २९/०१/२०२५.

   

१.जुने बिनशेती व रेखांकन आदेश,

२.जुने  वाटप व बिनशेती न्यायालयीन अपिल आदेश

संकलन – जबाबी - नाव - श्री. योगेश कृष्‍णा कुडाळकर, पदनाम – ग्राम महसुल अधिकारी
अनुक्रमाणिका