धबधबे
सावडाव धबधबा : तालुका – कणकवली
हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव गावामध्ये स्थित असलेला एक सुंदर नैसर्गिक धबधबा आहे. हिरव्यागार जंगलात वसलेला हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. कणकवली मधून येथे सहज पोहोचता येते. धबधब्यापर्यंत वाहनाने जाता येते पोहोचण्यासाठी कणकवली मधून सुमारे 15 ते 20 मिनिटे लागतात. पावसाळ्यात या धबधब्याचा जलप्रवाह जास्त असल्यामुळे तो अधिक आकर्षक दिसतो. येथे येण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वात योग्य आहे. पिकनिक, फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. मात्र, पावसाळ्यात दगड घसराळ असतात म्हणून काळजी घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
अनुक्रमाणिका
Toggle