प्रसिद्ध धार्मिक स्थळे
१ कुणकेश्वर मंदिर – देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले हे शिवमंदिर “कोंकणकाशी” म्हणून प्रसिद्ध आहे. प्रथम शिलाहार वंशीयांनी इ. स. 11व्या शतकात बांधले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा दुरुस्त केले.
हे मंदिर कोंकण शैलीतील मजगूत दगडी उद्धारामुळे त्याची आणखी महत्त्व आहे. बाह्य आणि अंतर्गत भिंतीवरील प्रभावी शिल्पकला पाहण्याजोगी आहे
महाशिवरात्री यात्रा आहे, मोठ्या संख्येने भक्त या काळात येथे येतात.
२ स्वामी समर्थ मठ, हडपीड (तालुका देवगड)
हे एक अत्यंत पवित्र व भक्तिभावाने भरलेला आध्यात्मिक केंद्र आहे. या मठाचे व्यवस्थापन स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) यांच्याकडे आहे. स्वामी समर्थांच्या अक्कलकोट प्रकटदिनाच्या निमित्ताने वर्धापन दिन दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यामध्ये पालखी मिरवणूक, नामस्मरण, पादुका पूजन, होम-हवन, कुंकू मर्दन, महाआरती, भक्तिगीत, महाप्रसाद आणि संध्याकाळी पारंपरिक लोकनाट्य यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. हडपीड मठात दर गुरुवारी व पौर्णिमेला भक्तांसाठी नामजप व प्रसाद वाटप होते. दत्तजयंती व गुरुपौर्णिमेसारखे सणही येथे भक्तिभावाने साजरे होतात, ज्यामध्ये विद्यार्थी सत्कार व भक्तिमय संध्या यांचा समावेश असतो. हे स्थान स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी प्रेरणा व श्रद्धेचे स्थळ आहे, जिथे भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
३ परमहंस भालचंद्र महाराज मठ – कणकवली
स्व. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्म ८ जानेवारी १९०४ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात झाला, ते अत्यंत आध्यात्मिक साधनास्थितीत व तपश्चर्येत मग्न राहिले. ते १९२६ मध्ये कणकवलीत आले आणि पुढील ३०-५५ वर्षे येथे अक्षरशः समाधीस्थितीत ध्यानमग्न अवस्थेत राहिले. त्यानंतर याच जागेवर त्यांनी समाधी घेतली ते पवित्र ठिकाण आज भालचंद्र महाराज मठ म्हणून ओळखले जाते. या आश्रमात काशी‑विश्वेश्वर मंदिर समोर समाधीक्षेत्र बांधण्यात आले असून त्याच्या परिसरात त्यांची स्मृतिचिन्हे व तपश्चर्यास्थाने उभारण्यात आली आहेत.
अनेक भक्तांना या ठिकाणी भजन, नामस्मरण आणि समाधीपूजनाद्वारे त्यांच्या कृपेची अनुभूती होते. आश्रमात भक्तांना ‘भक्त निवास’ सुविधा उपलब्ध असून उत्सवांच्या विशेष दिवशी अधिक योगदानाने पूजा‑अभिषेक करण्याची व्यवस्था आहे
प्रसिद्ध वार्षिक कार्यक्रमांमध्ये पुण्यतिथी उत्सव आणि जन्मोत्सव यांचा समावेश आहे, ज्यात समाधीपूजन, काकड आरती, अभिषेक, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक आणि भक्तांसाठी महाप्रसाद यांचा समावेश असतो
या मठाचे वातावरण अत्यंत शांत आणि दिव्यतेने भरलेले असते, जिथे भक्त वर्षभर दर्शनास येत राहतात आणि त्यांच्या दुःखांचे समाधान प्राप्त करतात.